बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई |  राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नुकतेच शिवसेनेने राज्यसभा उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषिमंत्री तथा भाजप नेते अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु, अनिल बोंडे यांचे नाव अनपेक्षित असताना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडूण येतील एवढे संख्याबळ आहे. तसेच भाजपचे दोन उमेदवार निवडूण येतील इतके संख्याबळ आहे. मात्र, शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यातच आता भाजप तिसरा उमेदवार देणार का?  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल, ‘हे’ कारण आलं समोर

‘भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली’; नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र

सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची माफी, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More