ठरलं तर! पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
पंढरपूर | पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा बिनविरोध जिंकेल अशी चिन्हे होती. मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा मोडीत काढत भाजपने मतदार संघासाठी आपला उमेदवार निवडणुकी्च्या रिंगणात उतरवला आहे.
भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघांसाठी समाधान अवताडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. समाधान अवताडे यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीसमोर एक तगड आव्हान देलं गेलं आहे. तर राष्ट्रवादीकडून अनेकजण या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तासगाव पॅटर्न प्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते.
राष्ट्रवादीने नाकारलेला उमेदवार राष्ट्रवादीसमोर उभा करायचा असा भाजपचा प्रयत्न होता. परंतू राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्यास उशीर केल्यानं भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेनंतर ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
दरम्यान, समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून ते भाजपचं काम करत आले आहेत. तर त्यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
थोडक्यात बातम्या-
नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत डान्स, पाहा व्हिडीओ
एकाच षटकात हार्दिक पांड्याने मारले तीन गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
अखेर 6 दिवस अडकलेलं महाकाय जहाज सुटलं; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान
‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
“सपासप कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.