नागपूर महाराष्ट्र

भाजपने शिवसेनेच्या या जागांवर सांगितला हक्क

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. नागपुरातील रामटेकच्या जागेची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे.

विद्यमान आमदार भाजपचा असल्यामुळे रामटेक आणि काटोलची जागा भाजप लढवणार, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

रामटेकमध्ये द्वारम रेड्डी हे भाजप आमदार आहेत. 2014 मधील निवडणुकीत वेगवेगळे लढल्यानंतर रामटेकमध्ये कमळ फुललं होतं.रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली होती. 1999 पासून शिवसेनेचे आशिष जयस्वाल सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आले होते.

खासदार शिवसेनेचा असल्यामुळे साहजिकच शिवसेनेला विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, असं मानलं जातं. मात्र भाजपच्या घोषणेवर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या