बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राठोडांची अवस्था ‘सामना’मधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी”

मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणात संजय राठोडांनी काल माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर खोचक टीका करत सरकारला टोला लगावला आहे.

संजय राठोड यांनी काल एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, फक्त समाजाच्या नावावर भावनिक खेळ खेळल्याची टीका भातखळकरांनी केली. तसेच संजय राठोड यांची अवस्था सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झाली आहे असंही ते यावेळी बोलले.

मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र समितीमार्फत संबंधित प्रकरणाची चौकशी करावी तत्पुर्वी वनमंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपतर्फे अतुल भातखळकरांनी केली आहे.

यापुर्वीही, राठोड हे कुठे गेलेत, हे मी सांगू शकत नाही. ते वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांच्याकडुन लगावण्यात आला होता. त्यानंतर, यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर येतील, असं सांगितलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर

…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा

प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं

संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे

कल्याणमध्ये तुफान राडा; काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीनं दिला चोप, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More