उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; बडा नेता बांधणार शिवबंधन

Uddhav Thackeray | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. असं असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बड्या नेत्याने नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. लवकरच ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. (Uddhav Thackeray)

वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे हे दोन नेते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत दोघांचाही पक्षप्रवेश पार पडणार आहे.

भाजपसह वंचितचा नेताही ठाकरे गटात जाणार

मविआचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर व नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते यांच्या प्रचारार्थ संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पवन पवार व विक्रम नागरे यांनी त्यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते ठाकरे गटात जाणार आहे. त्यामुळे वंचितसह भाजपलाही हा मोठा धक्का बसलाय. (Uddhav Thackeray)

आमची नाराजी दूर होत नसल्यामुळे आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नागरे यांनी म्हटलंय. विक्रम नागरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ताकद ही आता वाढणार आहे. तर, वंचितमधून निलंबित करण्यात आलेले पवन पवार देखील शिवबंधन बांधणार आहेत.

ठाकरे गटाची ताकद वाढणार

पवन पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून, पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पवन पवार यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. आता ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. (Uddhav Thackeray)

News Title :  BJP big leader will join Uddhav Thackeray group 

महत्वाच्या बातम्या –

खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?

PM मोदी उद्या पुण्यात; मंगळवारी ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल

कॉँग्रेसचा बंडखोरांना दणका, आबा बागुलांसह ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”