मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

बंगळुरू | लाचखोरी प्रकरणात कर्नाटक भाजपचे मोठे नेते आणि माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. 

रेड्डी यांच्यासह त्यांचा सहकारी अली खान यालाही अटक करण्यात आली आहे. तासभर चौकशी केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

भाजप सरकारच्या काळात रेड्डी मंत्री होते. याच काळात अँबिडेट मार्केटिंग या कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होणारी कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात सोन्याच्या रुपात 20 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

रेड्डी यांना सबळ पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आलीय, असं केंद्रीय गुन्हे शाखेचे आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद

-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

-शेवटच्या चेंडूवर भारताचा अत्यंत थरारक विजय

-नेता असावा तर असा! 21 कार्यकर्त्यांना फुकट वाटल्या दुचाकी

-शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी