भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जयपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. दौसा लोकसभा मतदारसंघातील खासदार हरीश मीणा यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.

राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट आणि सचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत मीणा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

खासदार मीणा यांच्यानंतर नागौर मतदारसंघातील भाजपचे आमदार हबीब उर रहमान हे देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, पक्ष सांगेल ती जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. तसच भाजपमधील अनेक जण काँग्रेसमध्ये आणणार असल्याचे मीणा यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा!

-दारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार!

-प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली!

-मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

-वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी