बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर आता राज्यसभेच्या 6 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या रिक्त जागेसाठी 4 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी आता काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने देखील या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यावर आता महसुलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रमोद महाजन यांची आठवण करू दिली आहे. त्यावेळी त्यांनी भाजपने राजकीय प्रथा मोडल्याचा आरोप केला आहे.

प्रमोद महाजन यांचं निधनानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. त्यावेळी प्रमोद महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. राजकारणात एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे. मात्र, ही परंपरा भाजपने मोडली असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली, हे योग्य नाही. राजकारणात काही संकेत असतात. भाजपने सध्या उमेदवारी दिली असली तरी आम्ही भाजपला उमेदवारी देऊ नका अशी विनंती देखील करू, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

चेन्नईच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट! रायडू आयपीएल खेळणार की नाही?, आली मोठी माहिती समोर

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More