पुण्यात अनिल शिरोळेंना डच्चू तर गिरीश बापटांना लागली लॉटरी!

पुणे | भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे.यात चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरीष बापट यांना तिकीट देण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी वरून जोरदार चर्चा सुरू होत्या. भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून शिरोळे की बापट हे कोडं सोडवून चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

गिरीष बापट यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिरोळे गटात नाराजी पाहायला मिळाली.

दरम्यान, गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबरोबर त्यांच्या कसबा या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच फिल्डींग लावायला सुरूवात केलीय.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांची ‘पॉवर’फुल खेळी, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल