भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

पुणे | भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा घणाघात शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पुण्यातील राजगुरूनगर येथे बोलत होते.

सत्तेची सूज चढल्यामुळे भाजप व्यक्तिगत सुडाचे राजकारण करीत आहे. शिवसेना आमदारांची कामे केली जात नाहीत. या पद्धतीने शिवसेना संपविण्याचा विचार भाजप करीत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आगामी निवडणुकीत राज्यात आणि दिल्लीत भाजपचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय राज्यात शिवसेनेचीच सत्ता येईल आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, सावधान राहा- राज ठाकरे

-खडसेंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; दमानिया यांच्या विरोधातील FIR रद्द करण्याचे आदेश

-आता डॉ. हाथीची भूमिका साकारणार ‘हा’ कलाकार!

-अकेले शेर को जंगली कुत्ते भी हरा सकते है- मोहन भागवत

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या