लोकसभेतील जरांगे फॅक्टरमुळे भाजप सावध, विधानसभेला मोठी खेळी

Bjp | लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात ‘मराठा’ जातीचे नेते खासदार म्हणून विजयी झाले. विधानसभा निवडणुकीतही मराठा मतपेढी एकत्र राहील, असं मानलं जात आहे. पण विधानसभा मतदारसंघाची रचना आणि मतदारसंख्या याचा विचार करता केवळ जरांग फॅक्टरने विजय मिळवता येणार नाही, असा दावा केला जातो.

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतपेढीला मुस्लिम मतपेढीने साथ दिल्यामुळे महायुतीविरोधात निकाल गेल्याचं दिसलं होतं. याचा फटका भाजपला सर्वाधिक बसला होता. लोकसभेचा धसका घेत आता विधानसभेला भाजपने सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. भाजपने सर्वात आधी विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Bjp ची विधानसभेला मोठी खेळी

भाजपने (Bjp) जाहीर केलेली ही यादी जवळपास 99 जणांची असून यात भाजपने एक मोठी खेळी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांचा फटका बसल्यानतंर आता विधानसभेत भाजपने 10 मराठा उमेदवारांना संधी दिली आहे.

भाजपच्या (Bjp) पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील इतर 6 जागांवर विविध जातीतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. सर्वाधिक संवेदनशील झालेल्या मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मनोज जारंगे पाटील यांचा फॅक्टर कमी कसा करता येईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलं आहे.

विदर्भामधून सर्वाधिक कुणबी उमेदवार देण्यात आले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजितदादा गटाची यादी थोड्याच वेळात जाहीर; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

बीडमध्ये मोठी उलथापालथ; पंकजा मुंडेंना धक्का

भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव

उमेदवारी न मिळाल्याने नगरमध्ये नाराजी नाट्य; भाजपचा बडा नेता बंडाच्या तयारीत?