मुंबई | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोपणनावाच्या मुद्द्यावरून पुन्हा भाष्य केलंय. यावेळी त्यांनी जयंत पाटील, शरद पवार तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केलंय.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो म्हणून ‘चंपा’ असं संबोधणं अयोग्य आहे. यानुसार जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शपा’ किंवा उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर हे सुसंस्कृत राजकारणात बसणारे ठरणार नाही.”
यापूर्वी जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये असं विधान केलं होतं.
दरम्यान, राज्यातील सरकार भाजपा पडणार नाही. त्यांच्या अंतर्गत कलहातूनच ते सरकार पडेल असे चित्र दिसत असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार
प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…
सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!
“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”
ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..