बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला एकाच माळेचं मणी म्हटलं आहे.

मायावती ट्वीट करत म्हणाल्या की, सत्तेत असताना पुर्ण वेळ डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या कोट्यावधी शोषित-पीडित अनुयायांकडे दुर्लक्ष व छळ केल्यानंतर आता विधानसभा निवडणुका जवळ येताच उत्तर प्रदेशचे भाजप सरकार बाबासाहेबांच्या नावावर सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी करत आहे. हे सर्व नाटक नाही तर काय आहे?

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अशा प्रकारच्या नाटकबााजीच्या बाबतीत भाजपचे सरकार असो, समाजवादी पार्टीचे असो किंवा कॉंग्रेसचे, कोणीही कुणापेक्षा कमी नाही. दलित व मागासवर्गीयांच्या हक्कांच्या बाबतीत भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकाच माळेचे मणी आहेत.

यामुळेच दलित आणि मागासवर्गासाठी राखीव असणारी लाखो सरकारी पदे अद्याप रिक्त आहेत. तसेच यांच्या संतांच्या, गुरूंच्या आणि थोर पुरुषांच्या नावावर उत्तर प्रदेशात बसपा सरकारने बांधलेली जागतिक दर्जाची भव्य स्थाने आणि उद्याने देखील मागील समाजवादी पार्टीच्या कारकिर्दीपासून सातत्याने दुर्लक्षित आहेत, अशीही टीका मायावती यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

‘भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’; अनिल देशमुख प्रकरणावरून राऊतांनी सुनावले खडेबोल

खुशखबर! सोनं दोन हजारांनी तर चांदी चार हजारांनी घसरली; वाचा ताजे दर

‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती’; थोरातांच्या लेकीचं पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर

‘तारक मेहता…’मधील पोपटलाल ‘या’ रोमॅण्टिक चायनीझ चित्रपटात झळकला होता! पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More