खेळ अजून संपलेला नाही; मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता स्थापनेची तयारी?

भोपाळ | विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत भाजपला भलेही धक्का बसला असेल, मात्र सत्ता स्थापनेचा खेळ अद्याप संपलेला नाही, हे भाजपनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. 

मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या असून त्यांनी सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे. 

दुसरीकडे भाजपला 109 जागा मिळाल्या असून भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी खेळी सुरु केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या घरी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 

काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आणखी 2 जागांची आवश्यक्ता आहे तर भाजपला 7 जागा आवश्यक आहे. मात्र आम्ही अजून रेसमध्ये आहोत, अशा इशारा भाजपने दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

-लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे