’40 वर्षापासून भाजपची सेवा करतोय… हे आमच्या कुटुंबाचं चुकलं का?’; पुण्यातील नगरसेवकाचं होर्डिंग चर्चेत
पुणे |पुण्यात सध्या भाजपच्या एका नगरसेवकाचं होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे. होर्डिंगच्या माध्यमातून या नगरसेवकाने आपली नाराजी जाहीरपणे उघड केली आहे. रवी बाबासाहेब लांडगे असं नगरसेवकाचं नाव आहे.
सत्ताधारी भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी हे होर्डिंग लावले आहेत. यामध्ये 40 वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय हे आमचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का?, असं होर्डिंगवर लिहिण्यात आलं आहे.
रवी लांडगे कशामुळे नाराज आहेत तर, महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रवी लांडगेंचं नाव आघाडीवर होतं मात्र त्यांना डावलत इतरांना अध्यक्षपद देण्यात आलं. यामुळे रवी लांडगे दुखावले गेले होते त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी शहरभर नाराजीचे होर्डिंग लावले आहेत.
दरम्यान, येत्या महानगरलपालिकेच्या निवडणुकीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कारण या होर्डिंगची चर्चा स्थानिक राजकारणात मोठ्या प्रमाणात होत आहे. हे पोस्टर रवी लांडगे यांनी आपल्या फेसबुकवरसुद्धा पोस्ट केले आहेत. तर समर्थकांनी #WeSupportRaviLandge असा हॅशटॅग वापरला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”
…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ
एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र
धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ
Comments are closed.