Loading...

शिवसेना-भाजपमध्ये सारं आलबेल नाही; भाजप नगरसेवकानं आदित्य ठाकरेंना रोखलं

मुंबई | भाजप नगरसेवकांनी उद्यानाच्या नामकरणावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना रोखल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यात दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

आदित्य  ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या उद्यानाचे पाच महिन्यांपूर्वीच भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उद्घाटन केलं होतं. पण तेव्हा या उद्यानाला ‘स्वर्गीय वसंत डावखरे’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता याचं नाव बदलून ‘वनस्थळी उद्यान’, असं ठेवण्यात आलं आहे.

Loading...

आदित्य ठाकरें उद्यानाचे उद्घाटन करून कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडताना ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नारायण पवार आणि इतर नगरसेवकांनी आदित्य ठाकरेंना रोखलं असल्याचं समजतंय.

दरम्यान, उद्यानाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांनी आधीच केले असून या उद्यानाचे नाव स्वर्गीय वसंत डावखरे असंच ठेवावं, असा आग्रह नगरसेवकांनी केल्याचं समजतंय.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-रक्षाबंधनच्या मुहूर्तावर केजरीवाल सरकारचं महिलांसाठी स्पेशल गिफ्ट; भाऊबीजेपासून अंमलबजावणी

-मी बिकाऊ नाही; मुलाला अटक केल्यानंतर भाजप खासदाराचं मोदींना ट्विट

Loading...

-अंबानी झाले आणखी श्रीमंत; गेल्या दोन दिवसात संपत्तीत झाली ‘इतक्या’ कोटींची वाढ!

-…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही- अजित पवार

-अटल बिहारी वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

 

Loading...