पुणे महाराष्ट्र

दानवेंच्या बचावासाठी पुण्याच्या दोन नगरसेवकांनी घेतला पुढाकार

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा फोटो टाईम मासिकातून प्रसिद्ध झाला होता. यावर अभिनंदनाचे ट्विट करुन अडचणीत आलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बचावासाठी पुण्यातील दोन नगरसेवक धावून आले आहेत.

रावसाहेब दानवेंच्या बदनामीचा हा कट आहे, असं म्हणत या घटनेचा तपास करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील आणि अमोल बालवडकर यांनी पोलिसांकडे केली आहे.

हे ट्विट दानवे यांनी केलेलं नाही. फोटो शाॅपचा वापर करुन दानवे यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

दरम्यान, टाईम या जगप्रसिद्ध मासिकातून ‘दुफळी करणारा भारतातील प्रमुख नेता’ असं म्हणत मोदींवर ताशेर ओढण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेस आमदार भडकल्या; जलसंपदा अधिकाऱ्याला हासडल्या इंग्रजीत शिव्या

-पडद्यावरील नथुराम भडकला; कमल हसनच्या वक्तव्यावर म्हणतो…

-शरद पवार फिल्डवरचे नेते; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

-ममता बॅनर्जींचा विनोदी फोटो केला व्हायरल; भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला पडलं महागात

-वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या