बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

मुंबई | ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी, असं आव्हान भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. भारतीय संविधानानुसार शपथ घेतलेल्या एका मंत्र्याने, एका विशिष्ट समाजाबद्दल अशा पद्धतीने  करणं वक्तव्य हे असंविधानीक आणि निषेधार्ह असल्याचंही भाजपने म्हटलं आहे.

भारतातल्या ब्राह्मण समाजाला ‘बाहेरचे’ म्हणायचे आणि बाहेरच्या रोहिंग्यांना नागरिकता द्यायचा आग्रह धरायचा, असं म्हणत भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आता मुख्यमंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर कारवाई करतात का नाही?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातलं लुटारू सरकार- बाळासाहेब थोरात

नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे 5 संशयित रूग्ण पळाले

महत्वाच्या बातम्या-

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी

कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More