मुंबई | भाजपने बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो ट्वीट कर त्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे सावरकरांना म्हणत आहे की तात्याराव, काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं, असं दाखवण्यात आहे, अशी बोचरी टीका भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
बुधवारी भाजपने विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा गौरव प्रस्ताव आणला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर विधानसभेत भाजपने गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेनेने मात्र मवाळ अगोदर सावरकरांना भारतरत्न द्या, त्यानंतर गौरव प्रस्ताव स्वीकारु, अशी भूमिका घेतली. सेनेच्या याच भूमिकेवर ट्विटद्वारे भाजपने निशाणा साधला आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल, अशी टीका शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपवर केली.
तात्याराव,
काय म्हणू आता मी!
मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल.पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं… pic.twitter.com/l6sgFsbGz1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 27, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया
अमृता फडणवीसांना वेळीच तोंड आवरायला सांगा आवरा; शिवसेनेचं थेट भैय्याजी जोशींना पत्र
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून डॉन अरुण गवळीला न्यायालयाकडून पॅरोल मंजूर
‘येसूबाईं’ना नाही आवरेना लाठीकाठी खेळण्याचा मोह; पाहा व्हिडीओ
कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे- अनिल देशमुख
Comments are closed.