बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनिया गांधींनी आम्हाला ‘राजधर्म’ शिकवू नये; भाजपचा पलटवार

नवी दिल्ली | काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे. तसेच त्यांनी आम्हाला राजधर्म शिकवू नये, असं म्हणत भाजप नेते आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस पक्षाकडून सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दिल्ली विषयावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजधर्माचे पालन करावे, असं म्हणत सुनावले होते.

काँग्रेसने केलेली ही टीका भाजपला चांगलीच झोंबल्याचं दिसत आहे. रामलिला मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलताना सोनिया गांधींनी आरपारच्या लढाईची भाषा केली होती. ही कोणती भाषा आहे, असं म्हणत प्रसाद यांनी टीका केली आहे.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांनी केलेलं चुकीचं आहे का? तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चूक कसे. एनपीआर काँग्रेसनेच सुरु केले होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कन्हैया कुमारला राष्ट्रगीताचा विसर; शेवटच्या दोन ओळीत घातला घोळ

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी; छगन भुजबळांची मागणी

महत्वाच्या बातम्या-

आवडता खासदार कोण?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजपच्या ‘या’ खासदाराचं नाव

राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!

40 दिवसांत एका एकरातून शेतकऱ्यानं कमवले 3 लाख 60 हजार रुपये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More