बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुप्रिया ताई, विद्या चव्हाणांविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?- भाजप

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाद सुरु झाला असून भाजपने यावरुन विरोधी महिला नेत्यांना सवाल केला आहे. भाजपने यासंबंधी ट्विट केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे ताई आणि महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ताई, सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?, असा सवाल भाजपने केला आहे. भाजपने यासंबंधी ट्विट केलं आहे.

विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्या सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडित सुनेनं नातवासाठी कुटुंबीय माझा छळ करत असल्याचा म्हटलं आहे. यावरुन राजकारण पेटण्याची शक्यता असून भाजपनं सुळे आणि यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, विद्या चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गौप्यस्पोट त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

माझ्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

“मोदींनी सोशल मीडिया सोडला तर त्यांचे करोडो फाॅलोवर्स अनाथ होतील”

महत्वाच्या बातम्या-

“सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली, भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणवीसांना झटका; टेंशन वाढणार!

भाजप नेता म्हणतो, 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More