बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन वर्षांपासून महाराष्ट्र बंद करणे हा एकमेव अजेंडा, सुरूवात स्वत: घरी कडीबंद होऊन केली”

मुंबई | लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराचे संपुर्ण देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यात या घटनेचा निषेध म्हणून बंदची हाक दिली आहे. पण या बंदला मात्र भाजपकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असं वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र बंद वरून सकाळपासूनच भाजप नेत्यांनी समाजमाध्यमांद्वारे महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली असताना आता मुंबई भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ‘असा मुख्यमंत्री आणि असे सरकार होणे नाही’, असा टोला लगावण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहे.

सध्या रंगत असलेल्या वादात आता भाजप मुंबईच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र बंदचा एकमेव अजेंडा घेऊन गेली 2 वर्ष काम करत असल्याचा घणाघात केला आहे. तसेच या सर्वाची सुरूवात त्यांनी स्वत: घरात कडीबंद होऊन केली, असंही या ट्विटमध्ये म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत.

आज सकाळपासूनच भाजप आणि महाविकास आघाडीतील वाकयुद्ध हे चर्चेचा मुद्दा ठरला असताना वरचे वर हा मुद्दा आणखी पेटत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यासंबंधी आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More