मुंबई | सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरली आहे. अशा परीस्थितीत सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावरून भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवनेरीवर पारंपारिक पद्धतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करताना छत्रपती शिवरायांनी जसे तलवार आणि ढालीच्या जोरावर राज्य निर्माण केलं, त्याप्रमाणे आपल्या कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्याला अधोरेखित करत भाजपने एक ट्विट प्रसारित केलं आहे.
भाजपने ट्विटर वर एक व्हिडीओ प्रसारित केला यामध्ये शिवनेरीवर संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे काही छायाचित्रे एकत्रित केली आहेत. ‘निर्बंध आणि नियम फक्त जनतेसाठीच का? मास्क ही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ढाल असेल तर तुम्ही स्वतः उपस्थित असताना शिवनेरीवर मास्क ची ढाल गेली कुठे?’, असा प्रश्न भाजपने या ट्विटद्वारे सरकारला विचारला आहे.
निर्बंध आणि नियम फक्त जनतेसाठीच का? मास्क ही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ढाल असेल तर तुम्ही स्वतः उपस्थित असताना शिवनेरीवर मास्क ची ढाल गेली कुठे? pic.twitter.com/Ibfvtfxux1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 22, 2021
थोडक्यात बातम्या-
अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला….
अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया
“मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करुन त्यांच्या मित्रांना मोफत देण्याचं काम करत आहे “
समीर गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहत्यांना म्हणाला….
जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे