ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी
मुंबई | एकनाथ शिंदे बंड करुन कोणत्या पक्षात जाणार याची सर्वांनाच उत्सुक्ता लागली आहे. एकनाथ शिंदे गटाने मात्र अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. न्यायालयात दाखल खटत्यात शिंदे गटाने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेत आहोत असे जरी सांगितले तरी अद्याप तश्या प्रकारचे कोणतेही पत्र राज्यपालांना दिले नाही.
सुरुवातीपासूनच शिवसेनेचे हे अंतर्गत बंड आहे असे सतत बोलणारे भाजप नेते मात्र आघाडीवर आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्यपालांंची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे. 30 जून पर्यंत सरकारने बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी फडणवीसांनी सरकारकडे केली आहे. त्या अनुषंगाने 30 जूनला राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे आता जर मविआ सरकार आपले बहुमत सिद्ध करु शकले नाही तर हे सरकार पडणार आहे.
राज्यपालांना भाजपने पत्र दिले आहे. त्यात त्यानी राज्याच्या परिस्थिताचा उल्लेख केलाय. शिवसेनेचे 39 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको आहेत. तेव्हा ते अल्प मतात असून त्यांनी तसे जाहीर केले पाहीजे.
भाजपवर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपुर्वी आरोप केले होते. भाजपच या बंडाला जबाबदार असून त्यांचा एकनाथ शिंदे गटाला छुपा पाठींबा आहे. परंतु भाजप नेते ते आरोप मान्य करत नव्हते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या सत्ता संघर्षात उडी मारली असून शिवसेनेला कैचीत धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?
‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात
मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी
‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…
Comments are closed.