लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!

नवी दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेसचे नेते पी. एल. पुनिया यांनी मोदी-शहांवर निशाना साधला आहे.

लालकृष्ण यांच्यासारख्या धुरंधर संसदपटूऐवजी अमित शहा यांच्यासारख्या तडीपार नेत्याला गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. भाजप पक्ष सध्या एका व्यक्तीच्या ताब्यात गेला आहे, असं पी.एल. पुनिया यांनी म्हटलं आहे.

भाजप कडून लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अडवाणी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजप चा बालेकिल्ला आहे. लालकृष्ण अडवाणी 1991 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते.

महत्वाच्या बातम्या-

प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!

शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळालीय संधी….

संजय काकडेंचं बंड झालं थंड…. काँग्रेसवारी टळली!

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश!

भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….