अहमदनगरमध्ये आदल्या रात्री पडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha l आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. चौथ्या टप्प्यात 11 जागांसाठी ही लढत होत आहे. या लढतीत अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. अशातच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजपचे तालुकाध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल :

अहमदनगरमध्ये भाजप पक्षाने पैसे वाटल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आला आहे. भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटप करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात येत आहे. आता यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी पैसे वाटतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

या संपूर्ण प्रकरणावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके म्हणाले की, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्याचे दिसत आहे. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा तुफान पाऊस पडला आहे. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला असल्याचे दिसत आहे. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला देखील बळी पडणार नाही. त्यामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागेल.

https://twitter.com/Nilesh_LankeMLA/status/1789741374813950461?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1789741374813950461%7Ctwgr%5E8d2c80afd24da1ae878e2424c920b353f3d328c6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fahmednagar-lok-sabha-elections-nilesh-lanke-video-viral-allegation-that-bjp-distributed-money-maharashtra-marathi-news-1281450

Ahmednagar Loksabha l नेमकं प्रकरण काय? :

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते रात्री एकमेकांना भिडले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडली. त्यावेळी भाजपचे कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप देखील तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे घडला आहे.

अशातच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन गटात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. मात्र आता विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

News Title – BJP distributed money to voters in Ahmednagar Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या

या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार

“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण

“राजकारणी आहात की गावगुंड, अजित पवारांना निवडणूक जड जाणार”

नुडल्स खाणं जीवावर बेतलं, धक्कादायक घटना समोर

महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .