मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं….

फोटो- निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील स्क्रीनशॉट

भोपाळ | पाच राज्यांच्या निवडणुकांचे धक्कादायक निकाल हाती आले असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये भाजपसाठी जरा दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र याठिकाणी भाजपला मिळालेली एकूण मतं ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे. 

काँग्रेसला 40.9 टक्के मतदारांनी मतदान केलंय. तर दुसरीकडे भाजपला 41 टक्के मतदारांनी मतं दिली आहेत.

मतांचा विचार करायचा झाल्यास 1 कोटी 56 लाख 42 हजार 980 मतदारांनी भाजपला तर 1 कोटी 55 लाख 95 हजार 153 लोकांनी काँग्रेसला मतदान केलं आहे.

भाजपच्या तुलनेत काँग्रेसला मतं कमी मिळाली. मात्र काँग्रेसला भाजपपेक्षा 5 जागा जास्त मिळाल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

-लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे

-मोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा वर्मावर वार

-जिओच्या साम्राज्याला धक्का?; गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल