नवी दिल्ली | मुसलमानांना 1947 सालीच पाकिस्तानात पाठवलं असतं तर बरं झालं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोहमद अली जिन्ना वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या तयारीत होते. आपल्या पूर्वजांनी मोठी चुक केली आहे, त्याचीच किंमत आपण आज चुकवत आहोत. जर तेव्हाच मुस्लीम बांधवांना पाकिस्तानात पाठवलं असतं तर हिंदू एकत्र राहिले असते, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत.
देशातील क्रांतीकारी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा काही लोक देश तोडत होते. आपल्या पूर्वजांनी काही चुका केल्या. त्यामुळेच आपण आज ही परिस्थिती पाहत आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, गिरीराज सिंह हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेच असतात. त्यांच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
बेताल वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर एमआयएमची मोठी कारवाई
“वारिस पठाणसारख्याची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यात आहे”
महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडी सरकार फक्त योजना बंद करत सुटलं आहे का?; जयंत पाटील म्हणाले…
उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभेवर पाठवण्यास संजय काकडेंना आक्षेप
देशातील 25 सक्षम महिलांच्या यादीत नवनीत राणा यांचा समावेश
Comments are closed.