मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात

Mahayuti Crises

Mahayuti Crises l राज्याचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अशातच महायुतीकडून राज्यात उमेदवार जाहीर करून देखील आता मैत्रीपुर्ण लढत होताना दिसत आहे. परंतु, आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केला असतानाही भाजपने देखील आता एका बड्या नेत्याला एबी फॉर्म दिला आहे.

महायुतीमध्ये बिघाडी होणार? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. मात्र अशातच आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील भाजप पक्षाने एबी फॉर्म दिला आहे.

कारण वडगाव शेरी हा मतदारसंघात भाजप आग्रही होता. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केला असला तरी वडगाव शेरी मतदारसंघावरील दावा हा भाजप पक्षाने सोडलेला नव्हता. मात्र आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात निवडणुक लढवावी आग्रह धरला होता असे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.

Mahayuti Crises l महायुतीचे उमेदवार आमने- सामने येणार? :

मात्र आता भाजपने जगदीश मुळीक यांना एबी फॉर्म दिल्याने पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच आता जगदीश मुळीक हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आता महायुतीने हि बिघाडी वेळीच दुसर्स्ट न केल्यास अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना देखील पाहायला मिळू शकतो.

News Title – BJP give AB form to Jagdish Mulik

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात, कोणाकोणाला मिळाली संधी?

महायुतीत भाजपच ठरला मोठा भाऊ?, उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

निवडणुकीच्या काळात झिशान सिद्दीकींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

माढ्यात शरद पवार खेळणार मराठा कार्ड?, अभिजीत पाटलांनी घेतली जरांगेंची भेट

सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .