चंदीगढ | भाजपने हरियाणामध्ये टिक-टॉक स्टारला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. सोनाली फोगट असं या टिक-टॉक स्टारचं नाव आहे. सोनालीला भाजपने माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई विरोधात आदमपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
सोनालीचे टीक-टॉकवर एक लाखांपेंक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. राजकारणात येण्यापूर्वा सोनाली अभिनेत्री होती आणि तिने काही सिरियलमध्ये काम केलं आहे. टिक-टॉकवर मोठ्या प्रमाणात तिचा चाहता वर्ग आहे. रोज ती टिक-टॉकवर नव-नवे व्हीडिओ बनवत असते.
हिसार जिल्ह्यांत येणारा आदमपूर मतदारसंघ भजनलाल कुटुंबाचा गड आहे. भजनलाल कुटुंबाच्या एकाही सदस्याला या मतदारसंघातून कधी पराभवाचा सामना करावा लागला नाही.
स्वत: कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. 2014 मध्ये कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून विजयी झाले.
महत्वाच्या बातम्या-
मनसेला दुसरा मोठा धक्का; काल शिवसेनेकडून अन् आज भाजपकडून! https://t.co/dKnicamFNC @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
विद्यार्थ्यांचे विनोद तावडेंना टोमणे; ‘आता कसं वाटतंय लिस्टमध्ये नाव नसल्यावर…!’ https://t.co/gbilOpUImb @TawdeVinod
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
बाळासाहेबांना आजही मी खांद्यावर उचलून घेण्यास तयार- असदुद्दीन ओवैसी- https://t.co/T1nPeecTJY @asadowaisi @Prksh_Ambedkar
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.