Top News महाराष्ट्र मुंबई

न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!

मुंबई | जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावर कार्यक्रमावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाद सुरु आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, मात्र भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी याठिकाणी आंदोलन करत आधीच उद्घाटन कार्यक्रम उरला. यावरुन गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एका टीव्ही चॅनेलवर बोलताना एकमेंकांशी चांगलेच भिडले.

अमोल मिटकरी यांनी गोपिचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची लायकी काढली, त्यामुळे भडकलेल्या गोपिचंद पडळकर यांनी देखील अमोल मिटकरी यांची लायकी काढली. तुझ्यासारखे छप्पन पाहिले, असं मिटकरी पडळकरांना म्हणाले. त्यावर तुम्हाला संपवल्याशिवाय मी जात नाही, असं प्रत्युत्तर पडळकरांनी दिलं.

जरा नीट बोल, भाषा नीट वापर, सांभाळून बोल, तू पण नको बोलून, तू कोण लागून गेलास रे, कुणाशी बोलतोय रे?, अशा शब्दात दोघांनी एकमेकांवर जोरदार आगपाखड केली.

चोरासारखं जाऊन गोपिचंद पडळकरांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं, त्यावर चोरासारखं नव्हे हलग्या कडकडाटात, फटाके फोडून आम्ही पुतळ्याचं अनावर केलं, साऱ्या जेजुरीनं ते पाहिलं, असं पडळकर म्हणाले. त्यावर हा अजून एक शिशूपाल भाजपला घेऊन बुडणार, असा टोला मिटकरींनी पडळकरांना लगावला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर

बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!

BBCला सर्वात मोठा धक्का; ‘या’ देशाने प्रसारणावर आणली बंदी

हेक्टरनंतर आता नव्या गाडीचा जलवा; एमजी लाँच करतंय ‘ही’ जबरदस्त कार!

“पवारांसारख्या भ्रष्ट राजकारण्याच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या