बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार’; चंद्रकांत पाटलांचा दावा

कोल्हापूर | राज्याच्या राजकारणात 2019 ला मोठी ऐतिहासिक घडामोड घडली होती. कायम सोबत असणारे विरोधात आणि विरोधात असणारे सोबत आले होते. अगदी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाजप आणि शिवसेनेची मैत्री विरोधात बदलली ती कायमचीच. भाजपकडून सातत्यानं सरकार स्थापनेबाबत वक्तव्य केली जातात. आताही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यांन राज्यात खळबळ माजली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे बोलताना सरकार स्थापनेबाबत गौप्यस्फोट केला आहे. नवीन वर्षात भाजपचंच सरकार येणार, असं खळबळजनक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे दिवस आता संपले आहेत. त्यांची सत्ता आता काही दिवसांचीच राहिली आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.

कोल्हापूर येथे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाटील आपल्या जिल्ह्यात आले होते. अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे कारण कोल्हापूरमधील नगरपालिकांमध्ये भाजपचे सदस्य जास्त आहेत, असं पाटील म्हणाले आहेत. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात राज्याचे मंत्री सतेज पाटील आणि भाजप नेते अमल महाडिक यांच्यात पारंपारिक लढत होत आहे.

दरम्यान, जे लोकप्रतिनीधी अपक्ष आहेत ते सुद्धा भाजपला मतदान करणार आहेत. कारण त्यांना राज्यातल्या राजकीय परिस्थितीची चांगली जाण आहे. लवकरच नवीन वर्षात आम्ही सरकारमध्ये असणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘कोन है ये लोग, कहाॅं से आते है ये लोग’; आनंद महिंद्रांचा संतप्त सवाल

“नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यामुळेच…”

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More