बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार”

सातारा | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. महाविकास आघाडी अंतर्गत कलहातून पडणार असून लवकरच भाजप सत्तेत येईल, असं वारंवार भाजप नेत्यांकडून सांगितलं जात आहे. काही दिवसांपुर्वी हा सुर ओसरल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप सत्तेत येणार असल्याचं म्हटलंय.

मी पहिल्यांदाच खासदार झालो व अगदी कमी कालावधीत माझी मंत्रिपदाची शिफारस राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्येष्ठ असल्यानं त्यांना मंत्रीपद मिळाल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे. अल्पावधीतील माझ्या कामामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव पुढं केले होते. मला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून मी स्वतः ही नाराज नाही. कार्यकर्त्यांनीही होऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार माझ्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. केलेल्या कामांमुळे माझं नाव मंत्रीपदापर्यंत गेलं, त्याचा मला व जनतेला अभिमान आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी संपूर्ण मोदी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,  गेली अनेक दिवस राज्यात सत्ताबदल होईल, याची फक्त चर्चा होती. मात्र, आता ही चर्चा न राहता लवकरच सत्यात उतरेल. भाजपचा मुख्यमंत्री दिसेल, असंही त्यांनी कार्यक्रमावेळी बोलून दाखवलं आहे. फलटनच्या झिरपवाडीत खासदार निंबाळकर बोलत होते.

थोडक्यात बातम्या-

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अथिया-राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

काॅमेडी किंग जाॅनी लिव्हर लावणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर हजेरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More