बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे सोपवली ही मोठी जबाबदारी

पुणे | राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. संजय काकडेंची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडेंच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी  संजय काकडे यांना पत्र पाठवलं आहे. आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेलं कार्य तसेच संसदेतील आपलं उल्लेखनीय कार्य अभिनंदनीय आहे. आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितपणे होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या आगामी कारकीर्दीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा आशयाचं पत्र चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांना पाठवलं आहे.

कुख्यात गुन्हेगार गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयानं संजय काकडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला गेला होता.

दरम्यान, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखले जाते. मात्र दुसऱ्यांदा भाजपकडून काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही. त्यावेळी काकडे यांची उघडउघड नाराजी लपून राहिली नव्हती.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”

काय सांगता! हनीमूनच्या रात्री नवरदेवाला खोकणं पडलं महागात, नवरीने केलं असं की….

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

खुशखबर! यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More