बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडेंकडे भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपनं नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना मध्य प्रदेशचं प्रभारी पद दिलं आहे. तसेच त्यांना आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. निवडणुका लढवण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी सध्या भाजपची प्रभारी आहे. तसेच मी परवा मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. विधानसभेच्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणूकीची आणि लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. मी त्या मतदारसंघात प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपली आपली जबाबदारी दिली आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्ही सर्वजण काम करत आहोत. आमचा संकल्प हा अंत्यदयोचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही आम्ही उचलणार आहोत. याबाबत भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत चर्चा झाली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

उस उत्पादक आणि सहकाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय – देवेंद्र फडणवीस

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More