बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने राम सातपुते यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर सोपवली मोठी जबाबदारी!

मुंबई | भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. बुधवार 14 जुलै रोजी ही घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

राम सातपुते आणि मधुकेश्वर देसाई यांच्यासह इतर पाच जणांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली. यामध्ये अनूप कुमार साहा, मनीष सिंह, अर्पिता अपराजिता बडजेना, डॉ. अभिनव प्रकाश आणि नेहा जोशी यांचा समावेश आहे.

राम सातपुते यांना या कार्यकारणीत राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या आधी सातपुते यांच्यावर युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. विद्यार्थी चळवळीतून सातपुते यांचा उदय झाला असून युवकांच्या प्रश्नावर ते कायमच आक्रमकपणे आवाज उठवत असतात.

भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूण आज पक्षाने मला जबाबदारी दिली. सामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षनेतृत्वाने काम करण्याची राष्ट्रीय स्तरावर संधी दिली हे फक्त भाजप मध्येच होऊ शकतं . माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी कामाच्या माध्यमातून सार्थ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आगामी काळात अधिक सक्रियपणे काम करत युवकांचे प्रश्न समजून घेत संघटनवाढीसाठी निष्ठेने प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया राम सातपुते यांनी दिलीये.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता तोंड उघडायला तयार नाही”

“चंद्रकांत पाटील आणि भाजपने जनतेची माफी मागावी”

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती; असा करा अर्ज

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More