बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

नांदेड |  माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सात वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. परंतु भास्करराव यांंनी सात वर्षांचा संसार मोडत आता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत भास्करराव पाटील खतगावकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्यानं आपण पक्षांतर करत असल्याचं भास्करराव पाटील खतगावकर यांनी यावेळी म्हटलं आहे. खासदार प्रतापराव पाटील यांच्या एकाधिकारशाहीला आपण कंटाळलो आहोत. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा स्वगृही परतत असल्याचं खतगवाकर यांनी यावेळी सांगितलं आहे. आगामी पोटनिवडणुकीच्या अगोदर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

तसेच माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय तालमीत माझी जडणघडण झाली. देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातून मी तीनवेळा विजयी झालो. परंतु पक्षांतर करुन मी भाजपमध्ये आल्यानंतर माझी मते विचारात घेण्यात आली नाहीत, असं देखील खतगावकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षांतरानंतर लगेच राजकारणात आपण सक्रीय होणार असल्याचं देखील भास्करराव पाटील खतगावकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. खतगावकर यांच्या पक्षांतरानंतर नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More