मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत महाविकासआघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत.
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना रूग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी असून त्यांच्याकडे फौजही मोठी आहे. मात्र आम्ही साधी लोकं बसून चर्चा करतो, बैठका घेतो आणि कार्यकर्ते काम करतात.”
मात्र भाजपकडे जागतिक यंत्रणा आहे. त्यांना जागतिक स्तरावरुन मदत मिळते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय.
संजय राऊत पुढे म्हणाले, “शिवसेना पराभवचं आत्मचिंतन करेल मात्र आत्मचिंतनाची वेळ बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आलीये. चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही कृती तसंच अॅक्शनवाले आहोत.”
महत्वाच्या बातम्या-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांनंतर फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले…
दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून रवींद्र जडेजा बाहेर; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश
“शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा”
1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार- उद्धव ठाकरे
चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील ‘काश आज ईव्हीएम होता’- हसन मुश्रीफ