“ठाकरे सरकारची स्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही अशी झालीये”
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. तसेच राज्यात विकेंड लाॅकडाऊन देखील लावला आहे. यावरून भाजपने पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून, शनिवारी आणि रविवारी पूर्ण लाॅकडाऊन असेल, असं सरकारमधील मंत्री वृत्तवाहिन्यांवर सांगत आहेत. जनतेचं हित पाहून हा निर्णय झाला असल्याचं सांगितलं जात आहे. पण राज्यातील गोंधळाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकार विरोधी पक्षासह राज्यातील जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप केशव उपाध्याय यांनी केला आहे.
रोज बदलणारे नियम आणि सरकारमधील मंत्र्यांची परस्पर विरोधी वक्तव्य पाहता ठाकरे सरकारची स्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही अशी झाली आहे, असं केशव उपाध्याय यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारला राज्यात कठोर निर्बंध लावायचे आहेत की लाॅकडाऊन, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, संघ देशप्रेम शिकवतो. संघनिष्ठ अधिकाऱ्यांना शोधण्यापेक्षा विविध खात्यात भ्रष्टाचार करणाऱ्या वाझेंना शोधा, असा टोला त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यावेळी बोलताना लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
ॲानलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला, एकदा वडिलांनी मोबाईल तपासताच धक्कादायक बाब समोर
चारचाकीत एकटे असताना मास्क घालावं की नाही?, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला
मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ
कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.