भाजपकडे ‘इतक्या’ हजार कोटींचं उत्पन्न; एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली | देशात कुठेही निवडणूक लागल्यानंतर पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळतो. प्रत्येक पक्ष निवडणूकीत धो धो पैसा खर्च करतो. व्यक्तिगत देणग्यांमधून तर कधी इलेक्ट्रीकल बाॅन्डमधून हा पैसा पक्षाला मिळत असतो. त्यातच आता नव्या समोर आलेल्या आकड्यांवरून राष्ट्रीय पक्षाकडे हजारो कोटींच्या उत्पन्न असल्याची माहिती समोर आली आहे. तर केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाकडे 10 आकडी उत्पन्न असल्याची माहिती प्रकाशात आली आहे.
केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे तब्बल 3 हजार 623 कोटी रूपयांचं उत्पन्न असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 1 हजार 651 कोटी रूपये भाजपने खर्च केले असल्याची माहिती भाजपने निवडणूक आयोगाला दिली आहे. 2019-20 च्या आर्थिक रिपोर्टनुसार भाजपकडे 2018-19 मध्ये 2 हजार 410 कोटीचं उत्पन्न होतं. त्यामुळे एका वर्षात भाजपचं उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं आहे.
निवडणूक आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार, 2019-20 मध्ये इलेक्ट्रीकल बाॅन्डच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात 2 हजार 555 कोटी रूपये जमा झाले आहेत. तर 291 कोटी रूपये हे वैयक्तिक देणगीच्या स्वरूपात भाजपला मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षाचा आर्थिक आलेख पाहता भाजपचा खर्च सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाला देखील 2019-20 मध्ये 682 कोटीचं उत्पन्न झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाजपने काँग्रेसपेक्षा 5.3 पटीने जास्त कमाई केली आहे. तर भाजपने काँग्रेसच्या तुलनेत 1.6 पटीने जास्त खर्च देखील केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपने फक्त जाहिरातींसाठी 400 कोटीचा खर्च केला आहे. त्यात इलेक्ट्राॅनिक मीडियावर 293 कोटी खर्च केले आहेत.
–थोडक्यात बातम्या-
खायला डब्बा दिलाय पण तो रिकामाच, संजय राऊतांची घटना दुरूस्तीवरून केंद्रावर टीका
राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल
“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”
आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय
Comments are closed.