बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई | अनेक राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. पाच राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोपवली आहे. गोव्यातील प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये आता आणखी दोन नेत्यांचा समावेश झाला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांचाही समावेश करण्यात आला आहे.

गोव्यातील प्रचाराच्या मैदानात आता नितेश राणेंची एंट्री होणार आहे. गोव्यातील प्रचाराच्या निमित्ताने नितेश राणे आणि केशव उपाध्ये यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कोविशील्ड लस घेतली का?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

“माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला…”, गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

“त्यांच्यावर जबाबदारी देऊन पाहिलंय…”, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

“Omicron चा प्रसार चिंताजनक, नियम पाळले नाही तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागणार”

“तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”, अभिनेत्री मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More