Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवरायांच्या कन्येवरून भाजप-काँग्रेसमध्ये ‘ट्विट वॉर’

Photo Credit- Facebook/ BJp4Maharashtra, Indian national Congress

मुंबई| काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या कन्येबद्दल माहिती देत एक ट्विट केलं होतं. मात्र या ट्विटला रिट्विट करत भाजपने सावंतांनी खोटा इतिहास टाकल्याचा आरोप केला. त्यानंतर या आरोपाला उत्तर देत माहितीचा पुरावा दाखवून भाजपने महाराजांचा आपमान केला आहे, असं सावंतांनी म्हटलं आहे.

शिवरायांची कन्या सकवराबाई ऊर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्यानं हल्ला केला. अशी माहिती देत केलेल्या सावंतांच्या ट्विटवर भाजपने जोरदार टीका केली आहे. सकवारबाई हे महाराजांच्या कन्येचं नाही तर पत्नीचं नाव असून सखूबाई अस त्यांच्या कन्येचं नाव होत. असं म्हणत भाजपने सावंतांवर टीकास्त्र सोडलं.

काँग्रेस आणि त्यांचा खोटा इतिहास हे काही नवीन नसून काँग्रेसने आपल्या इतिहासाचे खोटे दावे दिले आहेत, मात्र,  महाराजांच्या इतिहासात असले प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत. तसेच सकवराबाईंना शिवरायांची कन्या म्हणून सावंतांनी अकलेचे तारे तोडले आहेत, अशा बोचऱ्या शब्दात भाजपने सावंतांवर टीका केली होती.

भाजपच्या या आरोपाला पुरावा दाखवत ‘भाजपचे तोंड फाडणारा हा पुरावा’ असं पुन्हा सावंतांनी ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये सावंतांनी एका पुस्ताकात केलेल्या उल्लेखाचा फोटो जोडला आहे. त्या फोटोनुसार सकवराबाई हे महाराजांच्या कन्येचे नाव असून सखवारबाई, सकवारबाई हे संकवारबाई नावाचे रुपे आहेत. सकवारबाई महाराजांच्या पत्नीचे देखील नाव होतं. मात्र भाजपने केेलेल्या आरोपामुळे भाजपने महाराजांचा अपमान करुन माझी बदनामी केली आहे. तरी भाजपने तत्काळ त्यांची माफी मागावी, अशी मागणी सावंतांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल त्यावेळी…- मोहन भागवत

राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती; म्हणाले…

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या