राफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस

नवी दिल्ली | राफेल प्रकरणी वैधता आणि मान्यता नसलेली कागदपत्रं सादर करुन भाजपने न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असं टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर केली आहे.

भाजपने अनेक महत्वाच्या गोष्टी गोपनीय ठेवल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीच हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी फक्त निर्णय देऊ शकतं. चौकशीच्या खोलात जाऊ शकतं नाही, त्यामुळे संयुक्त संसदीय समितीची गरज असल्याचं त्यानी म्हटलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”

-“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”

-‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न!

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया