बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल बोलत होते. यावेळी काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून पक्षांतर्गत अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे.

आताच्या घडीला देशात भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कार्यभार हाकण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. भाजपसमोर काँग्रेसच एक उत्तम पर्याय म्हणून उभे राहू शकतं, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाला संघटनात्मक निवडणुका घेण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर व्यापक सुधारणा घडवण्याचीही आवश्यकता आहे. याशिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि युवा नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्याची गरज आहे, असं कपिल सिब्बल म्हणालेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाला सूचक इशारा दिला आहे. जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. मात्र त्यांनी जे केलं, त्याविरोधात मी नाही. त्यांच्याकडे त्यासाठी योग्य कारण असू शकेल. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More