राजकारण तापलं! भाजपने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं मोठा राडा झाल्याचा पाहायलं मिळालं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले.

अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले

आज पुण्यातील जुन्नर भागात ही जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. यावेळी भाजपकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

“कधीही आम्हाला फास लागू शकतो”

आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे.

अजित पवार ज्या पद्धतीने चोरुन चोरुन बैठक घेतात. प्रचारसभांचा गैरवापर करतात. आमचा तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं. त्यांना महायुती मान्य नसेल तर अजित पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. अजित पवारांनी माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्ट घोषित करावं, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

अर्ज केलाय पण पैसे आले नाही, महिलांनो ‘या’ गोष्टी करा चेक

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!

पुण्यात राबवली लाडके दाजी योजना, हॉटेलच्या बिलावर मिळतेय 1500 रु. सूट

गुजरात टायटन्सच्या हेड कोचची धुरा ‘हा’ खेळाडू सांभाळणार; जाणून घ्या त्यामागची 3 मोठी कारणे

सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .