हिमाचल प्रदेशमध्ये भाजप अडचणीत, महाराष्ट्रातील ‘हा’ नेेेेेता पोहचला शिमल्यात
शिमला| गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये मोठी टक्कर सुरू आहे.
सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काॅंग्रेसनं 39 जागा तर भाजपनं 26 जागा काबीज केल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हिमाचल प्रदेशात काॅंग्रेसची सत्ता येईल, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हिमाचल प्रदेशची आतापर्यंतची मतमोजणी पाहता भाजप अडचणीत आल्याचं दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील एक नेत्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विनोद तावडे(Vinod Tawade) सध्या शिमल्यामध्ये पोहचले आहेत. तावडे आणि मंगल पांडेही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर(Jai Ram Thakur) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता भाजपच्या या नेत्यांमध्ये काय चर्चा होईल, याकडंं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या हिमाचल प्रदेशमधील काॅंग्रेसच्या विजयी आमदारांना जयपूरला पाठवण्यात येणार आहे. काॅंग्रेसनं ही सावधगिरीची भूमिका घेतली आहे. स्वत: प्रियंका गांधीही(Priyanka Gandhi) शिमल्यात दाखल झाल्या आहेत. तर सोनिया गांधी राजस्थानला दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे, तर काॅंग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.