Top News

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

नवी दिल्ली |  संपूर्ण देशात राफेल प्रकरण गाजत असताना शुक्रवारी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राफेल जेट विमानांच्या सौद्यात भारतातर्फे संरक्षण मंत्रालय फ्रान्सशी वाटाघाटी करत असतानाच त्याला समांतर वाटाघाटी पंतप्रधान कार्यालयाने केल्या आहेत, असा गौप्यस्फोट हिंदू दैनिकाने केला आहे.

संरक्षण खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘पीएमओ’शी केलेल्या पत्रव्यवहारातील मजकूरच हिंदूने आपल्या बातमीत प्रसिद्द केला आहे.

‘द हिंदू’च्या बातमीने भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. राफेल प्रकरणाची महत्वाची कागदपत्रेही आपल्या हाताशी लागले आहेत, असा दावा देखील ‘द हिंदू’ने केला आहे.

एकीकडे काँग्रेस अध्यक्ष मोदींवर राफेल प्रकरणी दररोज हल्लाबोल करत असताना आता ‘हिंदू’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे देशातील जनतेचा संशय अधिकच गडद होतोय की काय? अशी परिस्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी

-कोल्हापूरची जागा काँग्रेसनं स्वत:कडे घ्यावी- सतेज पाटील

अटलजी ‘महाभेसळी’चं सरकार चालवायचे काय?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील का?, विनोद तावडे म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या