बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

मुंबई | काही दिवसांपुर्वी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी 43 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेकांना या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काही खासदार नाराज असल्याचं समोर येत आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं उदयनराजे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांची बाजू घेत भाजपला टोले लगावले आहेत.

उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.

शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे खासदार होते. उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असतं. मात्र भाजपने फक्त उदयनराजेंचा वापर करून घेतला, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही- राहुल गांधी

शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More