बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांनी राजकीय वातावरण पेटत असल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी विरोध एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता भाजपच्या माजी आमदारानं काॅंग्रेसशी हात मिळवणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन हल्लाबोल केला आहे.

आपली जागा वाचविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निष्काषित केले असून भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष असल्याची टीका चरण वाघमारे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

रुग्णालयातील फोटोंवरुन नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, पहिला गुन्हा दाखल

“नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत”

असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ भागावर परिणाम, हवामान विभागाचा गंभीर इशारा

धर्मवीर सिनेमाच्या टीमवर ‘समरेणू’च्या दिग्दर्शकांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

सोन्याच्या दरात आज काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More