बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधी म्हणतात,”प्रभू श्रीराम म्हणजे न्याय आहे, धर्म आहे आणि सत्य आहे”

नवी दिल्ली | आगामी काळात देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. परिणामी प्रत्येक पक्षानं आपापली तयारी चालू केली आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर वादळी दौरा करण्यास प्रारंभ केला आहे. राहुल गांधी यांनी नव्यानंच हिंदु आणि हिंदुवाद या संकल्पनेवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे.

राहुल गांधी आणि काॅंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत तुफानी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये धर्माच्या नावावर राजकारण चालत आलं आहे, असं सांगितलं जातं. परिणामी येऊ घातलेल्या निवडणुकीत धर्माचा मुद्दा किती परिणामकारक ठरणार हे पहाणं महत्त्वाचं आहे. अशात राहुल गांधी यांच प्रभू श्रीरामांबाबतचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रभू श्रीराम स्वतः न्याय आहेत, सत्य आहेत, धर्म आहेत. त्यांच्या नावावर धोका देणं अधर्म आहे आणि भाजप तोच अधर्म करुन रामद्रोह करते आहे, अस राहुल गांधी म्हणाले आहेत. परिणामी त्यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अयोध्येत राम मंदीर होत असताना भाजप आता या मुद्द्याचा वापर करण्याचा प्रयत्न करेल अशी टीका काॅंग्रेसकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत काॅंग्रेसला यावेळी जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रियंका गांधी या सातत्यानं भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर आता राहुल गांधी यांनीदेखील भाजपला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्या”

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More